अॅड. परेश देशमुख सरचिटणीस, अॅड. पल्लवी तुळपुळे महिला मोर्चा अध्यक्षा
अलिबाग : प्रतिनिधी
भाजप अलिबाग तालुक्याची बैठक शुक्रवारी (दि. 28) पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अलिबाग विधानसभा मतदारसंघ सरचिटणीसपदी अॅड. परेश देशमुख, अलिबाग विधानसभा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून अॅड. पल्लवी तुळपुळे यांची, तर सहअध्यक्षा म्हणून संध्या शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. महिला मोर्चा अलिबाग तालुकाध्यक्ष म्हणून मंदाताई बळी, युवा मोर्चा अलिबाग तालुकाध्यक्षपदी अमित म्हात्रे, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, वाहतूक सेल अध्यक्षपदी बाळू उर्फ नरेंद्र तेलगे, तालुका चिटणीसपदी नितीन गुंड यांसह अन्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, परशुराम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य उदय काठे, दर्शन प्रभू, योगेश जाधव आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.