Breaking News

दि. रुबी मिल्सच्या कामगारांनी स्वीकारले जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण

खालापूर : रामप्रहर वृत्त
खालापूर तालुक्यातील खरसुंडी गावच्या हद्दीत असलेल्या दि रुबी मिल्समधील कामगारांनी भाजपप्रणित जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. तेथे युनिटच्या नामफलकाचे अनावरण भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6) करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष सनी यादव, कामगार आघाडीचे खालापूर अध्यक्ष रवींद्र पाटील, चंद्रकांत कडू, विशाल पारसकर, अल्ताफ शेख, सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ, सबका विकास या आधारावर कंपनीने कामगारांना न्याय दिला पाहिजे. तो जर दिला नाही, तर जय भारतीय जनरल कामगार संघटना कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची भूमिका स्वीकारेल. कंपनी व्यवस्थापनाने येथील कामगारांना अन्यायकारक वागणूक दिल्यास कंपनीचे गेट उघडू देणार नाही.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply