कर्जत ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊन जाहीर झाले आणि सगळच तिथल्या तिथे थांबले. अनेक परप्रांतीय महाराष्ट्रात अडकून राहिले. रेल्वे पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रत्येक स्थानकावर सुरक्षेसाठी असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही अडकून पडले. कर्जत स्थानकातसुद्धा रेल्वे सुरक्षा दलाचे विविध राज्यांतील व जिल्ह्यांतील 16-17 जवान आहेत. निरीक्षकांनी सर्वांचे जीवनमानच बदलण्याचा निर्धार करून त्यांना योगासनांचे धडे देण्यास सुरुवात केली. याद्वारे हे सर्व जण ’तंदुरुस्त राहा आणि कोरोनाला पळवा’, असा संदेश देत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे नेहमी ड्युटी संपल्यावर घरी जाणारे हे रेल्वे सुरक्षा दलातील जवान एक कुटुंब म्हणून बराकीत राहतात. पहाटे पाच-सव्वापाचला उठून फ्रेश होऊन तीन किमीच्या यार्ड परिसरात फिरतात. त्यानंतर बराकीच्या प्रांगणात वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ सिंग, सहाय्यक निरीक्षक पांडुरंग उबाळे, कॉन्स्टेबल पंकज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत आणि योगाचे प्रशिक्षण घेतात.
Check Also
आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …