Breaking News

द्रविड देणार वरिष्ठ खेळाडूंना प्रशिक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि देशाच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. द्रविड सोमवार (दि. 1)पासून भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर द्रविड आपला पदभार स्वीकारणार आहेत.

द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. मुंबईचा पृथ्वा शॉ हा या संघाचा कर्णधार होता. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर संघ चांगली कामगिरी करीत आहे, पण आता द्रविड यांच्याकडे भारताच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षकपद नसेल. ते वरिष्ठ संघाची धुरा सांभाळणार आहेत.

भारतीय खेळाडूंसाठी चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्यांना दुखापतीतून फिट बनवणे, त्यांचे पुनर्वसन करणे ही गोष्टदेखील आवश्यक असते. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही तांत्रिक गोष्टी घोटवून घेणे, हेदेखील गरजेचे ठरते. त्यामुळे ही जबाबदारी आता द्रविड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) द्रविड यांच्याबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आता द्रविड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असतील. द्रविड यांच्याबरोबर पारस म्हाम्ब्रे आणि अभय शर्मा हेही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहाय्यक प्रशिक्षकाचे काम पाहणार आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply