Breaking News

ब्रेथवेटला बसला दंड

मँचेस्टर : वृत्तसंस्था

वेस्ट इंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटच्या अडचणीत वाढल्या आहेत. विश्वचषक

स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणे त्याला महागात पडले आहे. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के इतका दंड त्याला ठोठावण्यात आला आहे.

ब्रेथवेट हा आयसीसी आचारसंहिता कलम 2.8 च्या उल्लंघनात दोषी आढळला आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अंपायरच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यासंदर्भातील आहे. ब्रेथवेटच्या अनुशासनात्मक रेकॉर्डमध्ये एक डिमॅरिट पॉईंट जोडला गेलाय. सप्टेंबर 2016मध्ये खेळाची संहिता आल्यानंतरचा त्याचा हा दुसरा गुन्हा आहे. ब्रेथवेटकडे आता 2 डिमॅरिट पॉईंट आहेत. 42वी ओव्हर टाकत असताना अंपायरने दिलेल्या वाईड बॉलवर ब्रेथवेटने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.  ब्रेथवेटने आपला गुन्हा कबुल केला असून तो दंडदेखील भरणार आहे. एमिरेट्स आयसीसी एलीट पॅनलचे मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी ब्रेथवेटला हा गुन्हा आणि दंड ठोठावला. त्यामुळे यासाठी अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply