मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी, तर विश्वस्तपदी वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि कार्यवाहपदी विष्णू सोनावणे निवडून आले आहेत.
शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे निवडून आले असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप चव्हाण यांचा पराभव केला. वाबळे यांना 206, तर चव्हाण यांना 165 मते मिळाली. विश्वस्तपदाच्या एका जागेवर वैजयंती कुलकर्णी-आपटे निवडून आल्या. कार्यवाहपदी विष्णू सोनावणे, उपाध्यक्षपदी दै. ‘आपलं महानगर’चे कार्यकारी संपादक संजय परब आणि टीव्ही 9 मराठीचे क्राईम एडिटर सुधाकर काश्यप, तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड निवडून आले. कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण काजरोळकर, शैलेंद्र शिर्के, स्वाती घोसाळकर, श्यामसुंदर सोन्नर, भीमराव गवळी, कल्पना राणे, देवेंंद्र भोगले, सारंग दर्शने आणि इंद्रायणी नार्वेकर निवडून आले आहेत.