Saturday , March 25 2023
Breaking News

पोलादपूर शहरामध्ये मराठा आरक्षणाचा जल्लोष

पोलादपूर ः प्रतिनिधी

तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या राज्य सरकारच्या युक्तिवादानुसार मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये निश्चित असल्याचा आदेश पारित झाल्याने महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी आमदार भरत गोगावले यांच्यासोबत माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर नगराध्यक्ष निलेश सुतार, उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ, शहरप्रमुख सुरेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, लक्ष्मण मोरे, दशरथ उतेकर,मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे, रामचंद्र साळुंखे, निलेश चिकणे, सुरेश शिंदे, विजयबुवा, गणपत उतेकर, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, बळीराम फौजदार दरेकर, अनिल दळवी, किसन रिंगे, उमेश कालेकर, प्रकाश कदम तसेच अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या वर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पोलादपूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी अनेक आंदोलने केली होती.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply