नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अखेर नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून, गांधी घराण्यावर प्रचंड निष्ठा असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राहुल गांधी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी माहिती पुढे येत आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कुणाच्या हाती द्यायची, यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बराच खल केला. गांधी कुटुंबीयांशीही याबाबत चर्चा झाली. या वेळी शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, जनार्दन द्विवेदी, ए. के. अँटनी, मुकुल वासनिक यांच्या नावांचा विचार झाला. यामध्ये पहिली पसंती शिंदे यांना मिळाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षात सध्या राजीनामासत्र सुरू असल्याने या निर्णयाची हायकमांडकडून लगेचच घोषणा केली जाणार नाही, अशीही चर्चा आहे.
Check Also
उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper