पनवेल : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि पेडणेकर कुटुंबीय यांच्या वतीने समाजश्रेष्ठी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त लघू व गृहउद्योग करणार्या उद्योजकांसाठी उत्पादनाचे प्रदर्शन, विक्री आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उद्योजक संजय पोतदार, आनंद पेडणेकर, चंद्रकांत दाभोलकर, नितीन पोवळे, दिनेश बायकेरीकर आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
