Breaking News

उपमहापौरांनी केली परिसरातील गटारांची पाहणी

पनवेल ः वार्ताहर

महापालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल परिसरातील गटारे, नाले, तसेच समस्यांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना पनवेल महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना देऊन जागेवर स्वतः उभे राहून त्या समस्यांचे निराकरण करून घेतले.

पनवेल परिसरातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे त्यातच भरतीचे पाणी उलटे आल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. त्याचप्रमाणे कित्येक ठिकाणचे नाले, गटारे हे तुंबून वाहत होती. या संदर्भात उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्या स्थितीची पाहणी केली. तातडीने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना उपाययोजना करायला लावल्या. काही ठिकाणी झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या ठिकाणी पनवेल अग्निशमन दलाला बोलावून हे झाड बाजूला काढून घेऊन रस्ता सुरळीत करून दिला. पनवेलवासीयांना यंदाच्या पावसाळ्यात कमीत कमी त्रास होईल, याकडे पनवेल महापालिकेचे लक्ष असेल, त्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी विशेष उपाययोजना करून साफसफाई मोहीम, नालेसफाई मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्यामुळे यंदा एवढा मुसळधार पाऊस पडूनही साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर झाला. सखल भागात पाणी साचण्याचे, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले असले, तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांना दरवर्षीसारखे यंदा त्रासाला सामोरे जावे लागले नाही. त्या संदर्भात वेळोवेळी उपाययोजना महापालिकेकडून सुरू असून आवश्यक त्या सूचना नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. उपमहापौर विक्रांत पाटील  नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक त्या सूचना नागरिकांसह अधिकारी व कर्मचार्‍यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply