Breaking News

भुजबळ, वडेट्टीवार याची हकालपट्टी करा

मराठा संघटनांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलने झाली. आजही प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आजपर्यंत 58 मूक मोर्चे, दोन ठोक मोर्चे तर 42 बांधवांचे बलिदान दिलेले आहे. या संपूर्ण लढ्यामध्ये मराठा समाजातील 14 हजार 700 बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मागण्यासाठी हे सर्व वादळ उठले आहे. मागास आयोगानेदेखील मराठा समाज आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याचे नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई सुरू असून, महाविकास आघाडी सरकारचे वकील बाजू मांडण्यास कमी पडत आहेत. यासाठी आपण पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा तसेच राज्य मंत्रिमंडळातील ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन समाजांत संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते पाहता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर करण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply