Breaking News

रायगड जिप शाळांत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान

सभापती देवकीबाई कातकरी, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्किम बालविकास योजनेंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उलवे नोडमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी (दि. 22) व करंजाडे सेक्टर 2 येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी (दि. 23) मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
या वेळी करंजाडे येथे झालेल्या कार्यक्रमात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली, तसेच मुलगा-मुलगी एकसमान मानण्याची प्रतिज्ञा सर्वांनी या वेळी घेतली.
या वेळी तरघरच्या सरपंच चैताली वाजेकर, उलव्याचे उपसरपंच जगदिश खारकर, वडघरचे सरपंच रविकांत भोपी, उपसरपंच शशिकांत भोईर, पनवेलचे प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड, तरघरचे माजी सरपंच रूपेश मोहिते, ग्रामसेवक एम. एस. मोकल, पवित्रा हाटले, गव्हाण बीट 1च्या पर्यवेक्षिका पूजा चांगोलेकर, गव्हाण बीट 2च्या पर्यवेक्षिका शशिकला राऊत, उलवा येथील शाळेचे मुख्याध्यापक देविदास म्हात्रे, कोंबडभुजे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका भोईर मॅडम, तरघरचे मुख्याध्यापक नरेश पवार, गणेशपुरी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम, उलवे ग्रामस्थ सचिन भगत, शीतल चिमाले, सपना भगत, राखी तेलंगे, लता भगत, अमृता कोळी, वैशाली भर्णुके यांसह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply