Breaking News

कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘स्नॅपशॉट फोटोग्राफी 2021’ स्पर्धेचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘स्नॅपशॉट फोटोग्राफी 2021’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेरा फोटोग्राफी असे दोन गट असून ‘ये दिवाळी शांती वाली’, ‘दिवाळी थ्रू माय लेन्स’ व ‘स्वदेशीचा प्रचार’ हे तीन विषय देण्यात आले आहेत. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी असून नाव नोंदणीची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 60 हजार रुपयांची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 7757000000 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले फोटोग्राफीतील कौशल्य दाखवावे, असे आवाहन सभागृह नेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply