मुरुड : प्रतिनिधी
येथील नगर परिषदे तर्फे नुकताच मुरुड अलंकापुर, कुभांरवाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चोनचाफा, चिकू, काजू, आंबा, जास्वद, पेरु, मोगरा, जुई, कन्हेर, बुलासियन, हेलीकोनिया, कडुलिंब व इतर जातीची झाडे लावण्यात आली.उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असे मत नगराध्याक्षा स्नेहा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्ष दिंडी काढण्यात आली. शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालय, सर एस ए हायस्कुल आणि नगर परिषद शाळांचे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी झाडे लावा झाडे जगवा आशा घोषणा दिल्या. यावेळी प्रत्येकांनी झाडांचे संवर्धन करुन झाडे जगवण्याचा प्रयत्न करु अशी शपथ देेण्यात आली. उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे, पर्यटन व नियोजन समिती सभापती पाडुरंग आरेकर, नगरसेवक मंगेश दांडेकर, डॉ. विश्वास चव्हाण, आशील दिवेकर, नगसेविका मुग्धा जोशी, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उषा खोत, दिपाली दिवेकर, युगा ठाकूर, नरेद्र नादगांवकर, किरण शहा, किशोर माळी, सतेज निमकर, डॉ. मुरलीधर गायकवाड, वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील, बालाजी घुगे, डॉ. सुभाष म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.