पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी यांनी कोरोनावर मात केली आहे. जनतेच्या संरक्षानासाठी कर्तव्यदक्ष राहणार्या पोलिसांना या कोरोना महामारीच्या काळात कर्तव्यबजावत असताना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे रिद्धी सिद्धी, कोळखे पेठ येथे राहणार्या व पनवेल ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे संदीप चौधरी यांना आपले कर्तव्य वजावत असताना दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी या कोरोना सारख्या रोगावर मात केली असून, ते ठणठणीत बरे झाले आहे.
त्यांना रुग्नालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले. त्यावेळी त्यांच्या सोसायटी मधील रहिवाश्यांनी फुलांचा वार्षाव करुन व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. या वेळी सोसायटीचे चेअरमन शरद नेवसे, सेक्रेटरी छाया होळकर, खजिनदार शौकत अली, सोसायटीचे व्यवस्थापक दत्तात्रय भोईटे व रहिवाशी उपस्थित होते.