Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा

फुंडे : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे शुक्रवारी (दि. 8) ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. शालेय परिपाठानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, गुरुकुल प्रमुख आर. एल. प्रक्षाले, तांत्रिक विभागप्रमुख आर. बी. गिर्‍हे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि रयत माऊली लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व महिला शिक्षिकांनीदेखील प्रतिमापूजन केले. त्यानंतर सर्व महिला शिक्षिकांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. एस. टी. म्हात्रे आणि विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू यांनी आपल्या मनोगतात महिला दिनाचे महत्त्व सांगून सर्व महिला शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. महिलांनी सक्षमपणे प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे, असे सांगितले. सांस्कृतिक विभागप्रमुख दर्शना माळी यांनी स्त्री-शक्तीवर आधारित स्वरचित कवितेचे वाचन केले. त्यानंतर सर्व महिला शिक्षिकांना शिक्षक बंधूंच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. अशा या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. मोहिते यांनी केले, तर आभार जी. सी. गोडगे यांनी मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply