Breaking News

म्हसळा पोस्ट ऑफिसची स्थिती दयनीय; इमारत मोडकळीस

म्हसळा : प्रतिनिधी

येथील पोस्ट ऑफीसची इमारत मोडकळीस आली आहे. स्लॅप कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तेथील कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत. येथील बहुतांश संगणक बंद पडले असून, या कार्यालया मार्फत देण्यात येणार्‍या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत.

म्हसळा पोस्ट ऑफीसमध्ये उपडाकपाल, पोस्टल अस्सीस्टंट, एमटीएस, पोस्टमन असे 7 ते 8 कर्मचारी कार्यरत आहेत. सरासरी 80-90 ग्राहकांची या कार्यालयात रोजची ये- जा सुरु असते.तालुक्यांतील केलटे, खामगाव, खरसई, कोळवट, मजगाव, चिखलप, गोंडघर, ताम्हने, मेंदडी, पाभरे, साळविंडे, तळवडे, वरवढणे या सबपोस्ट ऑफीसमधील कार्यालयीन कामेसुद्धा म्हसळा पोस्टावर अवलंबून असतात. मात्र संगणक बंद असल्यामुळे ही सर्वच कामे बंद आहेत. भारतभर डिजीटल इंडियाचे कामकाज गतीमान होत असताना संगणक बंद असल्यामुळे म्हसळा पोस्ट ऑफीसच्या सेवा बंद झाल्या आहेत, हे हास्यास्पद असल्याची चर्चा म्हसळा शहरात सुरु आहे.

संगणक बंद पडल्याने म्हसळा पोस्ट ऑफीसमधील रजिस्टर, स्पिड पोस्ट, रजिस्टर पार्सल, परदेशांत जाणारी पत्रे, पार्सल, विमा पत्रे, डाक, विमा हप्ता, बचत खाते व्यवहार, मनी ऑर्डर, टेलीफोन बिल भरणा, पोस्टल ऑर्डर विक्री, मनी ट्रान्सफर, विमा पॉलिसी हे सर्व व्यवहार मंगळवार (दि. 2) पासून ठप्प झाले आहेत.

-या कार्यालयांतील दोन संगणक बंद पडल्यामुळे मंगळवारपासून कामकाज ठप्प आहे. वरिष्ठ कार्यालयाला तशा पध्दतीची माहिती दिली आहे. वरिष्ठ कार्यालयालाकडून तज्ज्ञ आल्यानंतर पोस्टल सेवा सुरु करण्यात येतील.

-आय. एम. शेख, प्रभारी उप-डाकपाल,

म्हसळा पोस्ट ऑफीस

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply