Breaking News

गणपती उत्सवासाठी विविध साहित्य

भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे गणपती उत्सवासाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा पनवेलमधील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले.

उद्योगिनी, लघुउद्योजिका व बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत 23 ते 25 ऑगस्टदरम्यान गोखले हॉलमध्ये प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इकोफ्रेंडली मखर, मोदकांचे विविध प्रकार, सजावटीच्या पर्यावरणपूरक वस्तू, पूजेचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळाही होणार आहे.

उद्घाटन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, रायगड जि.प.चे माजी बांधकाम सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील, भाजप कर्जत तालुका चिटणीस पंकज पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply