Breaking News

जेएनपीटी बंदरातून सहा कोटींचे सोने हस्तगत

उरण : बातमीदार

जेएनपीटी बंदरात इराकवरून आलेल्या एका कंटेनरमध्ये सोन्याची बिस्किटे आढळली आहेत. 19 किलो वजनाच्या या बिस्किटांची भारतीय बाजारभावाने सहा कोटी 27 लाख इतकी किंमत आहे.

इराकहून आलेला कंटेनर (बीएएक्सयू 2629232-20डीव्ही) गुरुवारी (दि. 4) सायंकाळी पीयूबीजवळ नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनमध्ये स्कॅनिंग झाला. त्या वेळी कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय आल्याने त्यांनी हा कंटेनर जेएनपीटीच्या अखत्यारित असलेल्या यार्डमध्ये आणून उघडून तपासला. त्यात सोन्याची बिस्किटे दिसून आली.

अल कोसोमी एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड इम्पोर्ट नावाच्या आयातदार कंपनीने मागविलेला हा कंटेनर नागोया टॉवर नावाच्या जहाजातून जेएनपीटी बंदरात 1 जुलै रोजी उतरविण्यात आला होता. या कंटेनरमधील 1460 पैकी काही पाकिटांमध्ये खजुरामध्ये सोने लपवून आणल्याचे समोर आले आहे. संपूर्ण रात्रभर या कंटेनरची तपासणी केली असता, खजुराच्या बॉक्समध्ये प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून आलेली सोन्याची बिस्किटे दिसली. ती हस्तगत करण्यात आली आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply