Breaking News

आम्ही धमक्यांना घाबरत नाही : देवेंद्र फडणवीस

अकलूज : प्रतिनिधी
आम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत, आम्ही चौकशीला तयार आहोत, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.
फडणवीस रविवारी (दि. 12) अकलूज येथे आले होते. या वेळी त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यातून भाजप युतीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर विरोधकांकडून आरोप होत आहेत. त्यावर बोलताना, आम्ही विरोधकांच्या पोकळ धमक्यांना भीत नाही. आमचा कारभार जनतेने पाहिला आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत. आमच्या काळात कोणाची ही अडवणूक केली नाही. कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत, कसलाही भ्रष्टाचार केला नाही कोणाला काय चौकशी करायची ती करा. आम्ही चौकशीला तयार आहोत, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
या वेळी माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील आदी नेते उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply