Breaking News

खा. श्रीरंग बारणेंचे मोठी जुईत स्वागत

उरण : बातमीदार

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी खासदार व महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांचे मोठी जुई गावात जोरदार स्वागत केले. निमित्त होते प्रचार रॅलीचे. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला, महायुतीचा विजय असो, अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला होता. या प्रचार रॅलीत आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे शाखाप्रमुख किशोर पाटील, युवासेनेचे हेमंत भोईर, कुंदन पंडित, राजेश भोईर, अनंत पाटील, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष शशी पाटील, कोप्रोली गाव अध्यक्ष नंदन म्हात्रे, भरत पंडित, युवा अध्यक्ष प्रवीण घासे, माजी सरपंच नारायण पाटील, हरिश्चंद्र पाटील, के. जी. पाटील, कुणाल म्हात्रे, महिला प्रमुख जयश्री पंडित, नमिता पाटील, विशाखा पाटील, मेनका पाटील आदी उपस्थित होते.

प्रचार रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याविषयी व त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली, तसेच त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply