Saturday , June 3 2023
Breaking News

प्रेमपत्रावरून दोन कुटुंबांत राडा; 10 जण जखमी

राजकोट : वृत्तसंस्था

एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेमपत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिच्या शाळेच्या बॅगमध्ये प्रेमपत्र ठेवत होता, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे, मात्र मुलाच्या घरच्या मंडळींनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जखमींना राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील एका अधिकार्‍यांने सांगितले की, मुलगा त्रास देत असल्याचे मुलीने आपल्या घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांसोबत याबाबत चर्चा केली. त्या वेळी दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली असता मुलाच्या घरच्यांनी मुलीकडील लोकांच्या अंगावर मिरची पूड फेकली, तसेच लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण केली. यामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत. मुलाच्या घरच्यांनीसुद्धा मुलीकडील लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. बदनाम करण्यासाठी मुलीच्या घरच्यांनी प्रेमपत्र लिहिल्याचा खोटा आरोप त्यांनी केला आहे. आमच्या मुलाने कोणतेही प्रेमपत्र लिहिले नाही, असे मुलाच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply