Saturday , March 25 2023
Breaking News

पोल्ट्रीची भिंत पडली

शेकडो पक्षी मृत्युमुखी; सुधागडात लाखो रुपयांचे नुकसान

सुधागड-पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील कुंभारशेत ग्रामपंचायत हद्दीतील बलाप येथे वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी बलाप येथील शेतकरी संदीप खरीवले या शेतकर्‍याच्या गावाशेजारी असणार्‍या शेतात पोल्ट्रीची शेड आहे. या शेडमध्ये सहा ते सात हजार कोंबड्या आहेत. या पोल्ट्री शेडची  भिंत पडल्याने यामध्ये  200 ते 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर असे की बलाप येथे पहाटे साडे पाच ते सहा वाजता जोरदार वार्‍याबरोबर पावसाने आगमन केले. यावेळी शेतकरी संदीप खरीवले यांच्या मालकीची  पोल्ट्री शेडची भिंत पडून शेडचे एकबाजू या पावसात जमीनदोस्त झाले. या शेडमध्ये असलेल्या बॉयलर जातीच्या 200ते 250 कोंबड्यांचे जागीच मरण पावल्या. पोल्ट्री शेड, कोंबड्या असे जवळपास हजारो रुपयाचे नुकसान झाले असल्याचे समजते.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply