Thursday , March 23 2023
Breaking News

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम

उरण ः रामप्रहर वृत्त – राज्य शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष या योजनेंतर्गत पागोटे ग्रामपंचायतीत शनिवारी (दि. 6) शालेय वस्तूंचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी उपसभापती वैशाली पाटील, जिप सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सरपंच भार्गव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत शालेय वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून उच्च शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले, तसेच पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे त्यासाठी झाडे लावून ती जगली तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो, असे सांगितले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply