Breaking News

अलिबागमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

उपमहापौर विक्रांत पाटील यांची उपस्थिती

अलिबाग ः प्रतिनिधी

भाजप युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस व पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अलिबाग येथे करण्यात आला.  सध्या सर्वत्र भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान सर्वत्र सुरू आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातसुद्धा हे अभियान सुरू असून संघटन पर्व 2019  सदस्यता अभियान साथ आए देश बनाए, भाजपाचे सदस्य बना, अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून अलिबागमध्ये अशा सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply