Breaking News

पनवेलमध्ये आणखी पाच ठिकाणे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्दमध्ये दोन, विचुंबे, करंजाडे नोड, उमरोली अशा पाच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथील इमारती कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहे.

यामध्ये उसर्ली खुर्दमध्ये निळकंठ विश्व फेज 2 को.ऑ.हौ.सो.,बालाजी आर्केड फेज 1, ई व एफ विंग, विचुंबे येथील ज्ञानेश्वर माऊली को.ऑ.हौ.सो.,सी विंग व डी विंग, करंजाडे नोड येथील सेक्टर 4, प्लॉट नं.38 चंद्रदर्शन पॅराडाईज, उमरोली येथील ग्रीन रिव्हरसाईड को.ऑ.हौ.सो.4 ए विंग या संपूर्ण इमारती कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंन्टेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

उरण येथेही कंटेन्मेंट झोन

उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे गावी एकूण 22 व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जून कोळी यांच्या घराशेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिश्चंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रविंद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरि नाखवा यांच्या घरामधील गल्ली व भवानी चौक येथील जेटीकडे जाणारा अर्धा रस्ता, उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

करंजा येथील क्षेत्रात वाढ

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील करंजा येथे रविवारी 21 व सोमवारी 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने करंजा परिसरात पहिला रुग्ण आढळला तेव्हा सील करण्यात आलेल्या परिराचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.

यामध्ये पूर्वेला रोहिदास लक्ष्मण कोळी यांचे घरापासून लगत संकेत देविदास कोळी यांचे घरापासून शंकर भाऊ कोळी यांचे घरापर्यंतचा परिसर, पश्चिमेला संतोष रामदास रुमडे यांच्या घरापासून वासुदेव बाळकृष्ण कोळी घर न. 321 यांचे घरापर्यंत चा परिसर, दक्षिणेला वासुदेव बाळकृष्ण घर न. 321 पासून वासुदेव बाळकृष्ण यांचे नावे असलेले घर न,. 1261 पर्यंतचा परिसर उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा तसेच परीसरामध्ये एकूण अंदाजे 322 घरे व अंदाजे 1480 एवढी लोकसंख्या समाविष्ट आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply