लंडन : वृत्तसंस्था
आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील 350व्या विक्रमी विजयाची नोंद केली.
विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम 16मध्ये स्थान पटकाविण्यात यश मिळवले. फेडररने 17व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के केले. स्पेनचा राफेल नदालनेदेखील फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाविरुद्ध विजयासह आगेकूच केली. जपानच्या केई निशिकोरी याने एई सुगियामाचा पराभव केला. अमेरिकेच्या सॅम कुरे याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन विलमॅनचा पराभव केला. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन अॅश्ले बार्टीने प्रथमच चौथ्या फेरीत स्थान पटकाविले. सात वेळची चॅम्पियन सेरेना विलियम्सनेही पुढे पाऊल टाकले, तर दोन वेळची चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा पाच वर्षांत प्रथमच अंतिम 16मध्ये पोहोचली आहे.