Breaking News

कर्जतच्या वंजारवाडी येथे वृक्षारोपण

कडाव : प्रतिनिधी – 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत वंजारवाडीमधील संरक्षित वन क्षेत्रात विभागिय वनाधिकारी मनिष कुमार, ठाणे दक्षका पथकाचे सस्ते, पनवेल उपविभागीय वनाधिकारी एन. एम. कुप्ते यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. दिडशेहून अधिक ग्रामस्थांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही यावेळी वृक्षारोपण केले.

30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वंजारवाडीमधील वनविभागाच्या संरक्षित वनामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व्हे नंबर 35 च्या 25 हेक्टर क्षेत्रावर यावेळी खैर, शिवन, शिसव, काजू, आवल, कांचन, वेहला, बांबू, बावा या वृक्षांची वनविभागाकडून लागवड करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी, श्री. भुजबळ, वनपाल हिंमत पाटील, वनरक्षक बाळाजी घुले, आर. एस. निकम, पि. बी. कोळी, एच. जी. चव्हाण, जि. प. सदस्या रेखा दिसले, पं.स. सदस्या सुरेखा हरपुडे, आर. के. कोळंबे, मोहन धुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply