Breaking News

भाकरीचे गाव म्हणून होतेय घणसोलीची ओळख

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

भाकरी ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे 10 हजार भाकरींची विक्री होते.

तांदळाच्या भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीच्या विकासकामांमुळे बदलत आहे. गावाचे आता शहरीकरण झपाट्याने होत असताना गावातील महिलांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे आपली वेगळी ओळख टिकवून आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, या गावात घरी बनविल्या जाणार्‍या तांदळाच्या पिठापासून तयार होणारी पांढरी शुभ्र भाकरी. या भाकरीच्या व्यवसायामुळे गावठाणातील महिला मंडळे आणि काही महिलांच्या बचत गटांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण झाला आहे.

एक महिला एकावेळी 50 ते 70 भाकरी मातीच्या तव्यावर करून देते. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलांनाही येथील तांदळाच्या भाकर्‍या पुरविल्या जातात. घणसोलीत मशीनवर भाकरी बनविण्याच्या 10 ते 12 गृहउद्योग आहेत, तर कोपरखैरणे गावातील काही निवडक बचत गटाच्या महिला मंडळाकडूनही तांदळाच्या भाकर्‍या ऑर्डर्सनुसार बनविल्या जातात.

चुलीवर एक भाकरी तयार करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो, तर मशीनवर एकाचवेळी 10 मिनिटांमध्ये 10 ते 15 तांदळाच्या भाकरी तयार होतात. वेळ आणि कमी प्रमाणात इंधन बचत होत असल्याने भाकरीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

-गीता पाटील, भाकरी केंद्रचालक, घणसोली

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply