Tuesday , March 28 2023
Breaking News

लायन्स क्लब सेंटररी स्टील मार्केटच्या अध्यक्षपदी संगीता जोशी यांची निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त

लायन्स क्लब सेंटररी स्टील मार्केटची वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यावेळी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तसेच स्नेहकुंज आधारगृहच्या संचालिका सौ. संगीता जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. याबरोबरच इतर नवनिर्वाचित  पदाधिकार्‍यांनाही यावेळी  श्री. सूर्यवंशी यांच्या वतीने शपथ देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख श्री. सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सिंधू रामचंद्रन यांनी गेले वर्षभर विविध उपक्रम राबविले त्याचा अहवाल या सभेमध्ये सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विंग कमांडर राजेंद्र महानुभाव तसेच यशवंत बिड्ये, लायन नितीन जोशी यांनी केले. यावेळी विविध संस्था संघटनांचे 100हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम स्नेहकुंज आधारगृह नेरे याठिकाणी संपन्न झाला.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply