Tuesday , March 21 2023
Breaking News

नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल ः वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोळीवाडा येथील एका बंद घराचा काही भाग पडत असल्याचे नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी तातडीने धाव घेऊन सर्व यंत्रणा राबवून होणारी दुर्घटना टाळली आहे.

शहरातील कोळेश्वर मंदिराजवळील किशोर वाणी यांच्या बंद घराचा काही भाग पडू लागला होता. त्यामुळे त्याचा धोका शेजारील घरांना झाला होता व त्यामुळे एखादी मोठी दुर्घटनासुद्धा घडली असती, परंतु याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच महावितरण, पनवेल महानगरपालिका, अग्निशामक दल आदींना त्यांनी त्वरित संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. प्रभाग समिती डचे अधिकारी श्रीराम हजारे हेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले. जेसीबीच्या सहाय्याने दुमजली घराचा पडणारा काही भाग पाडण्यात आला त्यामुळे पुढील धोका टळला. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती राजू सोनी यांनी दिली.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply