अलिबाग : जिमाका
वाहन कर, पर्यावरण कर थकलेल्या आणि स्क्रॅप वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि.16) उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या जिते (ता. पेण) येथील तपासणी पथ (ढशीीं ढीरलज्ञ) या ठिकाणी करण्यात येणार आहे.
नोंदणी प्राधिकार्यांना असलेल्या अधिकारात जारी नोटीशीद्वारे वाहन मालकांना, ताबेदारांना वित्तदात्यांना जाहीररित्या कर व दंड भरुन वाहन सोडवून नेण्यासाठी अवगत केले आहे. वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. वाहनांच्या मालकांनी, ताबेदारांना, वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर व दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास 12 जुलैपर्यंत लेख हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
या जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी 11,12 व 15 जुलैला सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 25 हजार रुपये रक्कमेचा ऊध.ठढज झएछ या नावे अनामत रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट नाव नोंदणी करुन जमा करणे गरजेचे आहे. ही वाहने जशी आहेत तशी जाहीर लिलावाद्वारे विकली जातील.लिलाव करावयाच्या वाहनांचे ठिकाण, लिलावाच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर 11 जुलैपासून प्रदर्शित करण्यात येईल. लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी कळविले.