Breaking News

पंतप्रधान मोदींचा लीजन ऑफ मेरीट पुरस्काराने सन्मान

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधांतील वृद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे पंतप्रधान मोदींचा गौरव करण्यात आला. कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्याने अमेरिकेतील भारतीय राजदूत संधू तरनजीत यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा आणि जागतिक स्तरावर भारत हा नवीन शक्ती म्हणून पुढे येत आहे या गोष्टीला मिळणार्‍या पाठिंब्याचे प्रतिक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदींचा रशिया, यूएई, सऊदी अरब, फिलिस्तीन, मालदीवसह अनेक देशांनी त्यांच्या देशातील मानाच्या पुरस्काराने सन्मान केला आहे.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply