Breaking News

वासगाव येथील कार्यकर्ते भाजपमध्ये

पेण : प्रतिनिधी

राज्याचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व नारायण सुठे, रामचंद्र लक्ष्मण देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे-वासगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात नागोठणे-वासगाव येथील कमलाकर बांगारे, नारायण बांगारे, नामदेव भल्ला, चंद्रकांत हंबीर, महादू हंबीर, कोंडीराम आखाडे, गंगाराम आखाडे, परशुराम बोडेकर, सुभाष बावधणे, दीपक बावधणे, भाग्या हंबीर, जिमा आखाडे, मंगेश बुडेकर, रवींद्र बावधणे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रविशेठ पाटील यांनी स्वागत केले. 

मंत्री असताना रविशेठ पाटील यांनी आमच्या भागात जाण्यासाठी रस्त्याचे काम केले. पिण्याच्या पाण्याची सोय केली. अनेक विकासकामे केली. त्यामुळे आता आम्ही रविशेठ पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून पक्षसंघटना मजबूत करू, असे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply