Tuesday , March 28 2023
Breaking News

खोपोली शीळफाटा शाळा परिसरात झाड कोसळले

खोपोली : प्रतिनिधी

शहरातील शीळफाटा येथील सह्याद्री विद्यालयाच्या परिसरात सकाळी एक मोठे झाड अचानक कोसळले. त्यापूर्वी विद्यार्थी वर्गात पोहचल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र येथील मुख्य रस्ता एक दीड तास वाहतुकीसाठी बंद राहिला. सदर बाब सामाजिक कार्यकर्ते नंदू ओसवाल व दिनेश गुरव यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक गटाचे सदस्य व नगरसेवक किशोर पानसरे यांना सांगताच त्यांच्या पुढाकाराने नगरपालिका आपत्कालीन टीम, सामाजिक कार्यकर्ते बंडू क्षीरसागर व इतर घटनास्थळी पोहचले. नगरपालिका टीमने सदर कोसळलेले झाड यंत्रसामुग्री वापरून तोडून बाजूला केले.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply