Breaking News

विचुंबे येथील शेकापचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलजवळील विचुंबे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीनंतर आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेथील माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी (दि.20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहात दाखल होत आहेत. अशाच प्रकारे या वेळी विचुंबे ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच बळीराम दत्तात्रेय पाटील, नम्रता आकाश पाटील, स्वाती बळीराम पाटील, माजी उपसरपंच भरत दत्तात्रेय पाटील, गुरूनाथ म्हात्रे, सदस्य प्रणाली राम पाटील, प्रमिला गुरूनाथ म्हात्रे, युवा कार्यकर्ते आकाश कृष्णा पाटील, ओमकार बळीराम पाटील, महेंद्र कामटेकर, निलेश ठाकूर, विवेक पाटील, अविनाश पाटील, पूनम भरत पाटील यांनी विकासाचे कमळ हाती घेतले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रवीण खंडागळे, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप विचुंबे गाव अध्यक्ष के.सी.पाटील, सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, सुकापूर सरपंच राजेश पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, उपसरपंच रवींद्र भोईर, माजी सरपंच राम म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील, किरण भोईर, डी.के.भोईर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड, सदस्य अनिल भोईर, अनंता गायकवाड, विवेक भोईर, आनंद गोंधळी, चेतन सुरते, जगदीश भोईर, प्रितेश भिंगारकर, दादा गोंधळी, नागेश भिंगारकर, चेतन भिंगारकर, नितीन भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश सर आदी उपस्थित होते.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply