Breaking News

सहयोग पतसंस्थेकडून वृक्षारोपण

अलिबाग : प्रतिनिधी

येथील सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील नामदेव मगर व शंकर भगत यांच्या शेतावर काजू, आवळा, पेरू व बांबू अशा 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांचे संवर्धन संबंधित शेतकरी करणार आहेत. अलिबाग तालुका सहाय्यक निबंधक अशोक मोरे, रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅॅड. जे. टी. पाटील, तुळजाभवानी पेट्रोलियमचे मालक हर्षल पाटील, निवृत्त नायब तहसीलदार दिलीप यादव, सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष  योगेश मगर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव सुनील तांबडकर, संचालक हरेश गायकर, जहिंद्र पाटील, अनिल थळकर, अ‍ॅड. प्रथमेश पाटील, व्यवस्थापक वैभव बोर्लीकर, पांडुरंग झावरे, गणेश मौर्य, नरेंद्र पाटील, अनिल आंबोले, सुनील तांडेल, विजय सुंकले, गितेश गुरव, शैैलेश वाडकर, संदेश कवळे, मिलिंद खानोलकर, पंकज पंडित, साहिल जाधव, भूषण मगर, श्रावणी मगर यांच्यासह कार्ले ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply