Breaking News

बलात्कारी नराधमाच्या आवळल्या मुसक्या

सेलिब्रेशनसाठी आलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरण

पनवेल ः वार्ताहर – ख्रिसमस व न्यू इयरनिमित्त मुंबईभ्रमण करण्यास आलेल्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास पनवेल शहर पोलिसांनी 12 तासांत जेरबंद केले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोळीवाडा स्मशानभूमीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे पनवेल येथील रिक्षाचालक सचिन नावाच्या अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेस दगडाने जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी  गु. र. नं. 1499/2020 भा. दं. वि. कलम 376, 506 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पीडित महिला छत्तीसगड येथून नाताळ व न्यू इयरसाठी आली होती. पीडिता सकाळी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली होती. येथे शिवा नावाच्या इसमाबरोबर तिची ओळख झाली व ती त्याच्यासोबत राहिली होती. तिने 27 डिसेंबरला पनवेल रेल्वेस्टेशन येथून रिक्षाला हात दाखवून गांधी गार्डनला सोडण्यास सांगितले असता त्याने पीडितेस वडघर नदीकाठी स्मशानभूमीच्या बाजूला झाडामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत वरिष्ठांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि. (गुन्हे) संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांनी तपास सुरू केला होता. चौकशी सुरू असताना आरोपीच्या ताब्यातील रिक्षाबाबत माहिती मिळाली. त्यावरून आरोपी सचिन लालताप्रसाद शर्मा (26, बारवाई गाव, पो. पोयंजे, ता. पनवेल) याला रिक्षासह ताब्यात घेण्यात आले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply