Breaking News

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमीधल गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.   कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थे मार्फत आद्योगीनी, लघुउद्योजक, व बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंनना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या साठी पनवेल मधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु राहणार आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, अंजली इनामदार, सुनीता खरे, उज्ज्वला पटवर्धन, समृद्धी जोग, गीता चौधरी, जयश्री पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रदर्शन व विक्री मेळाव्याला महापौर डॉ. कविता चौतमोल, आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी भेट दिली.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply