Monday , February 6 2023

‘जिस देश में गंगा बहती है’ उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि विजय आर्मी स्कूल चिखले यांच्या वतीने विजय आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत अनोखा असा जिस देश में गंगा बहती है, हा संगीतमय कार्यक्रम व भव्य सन्मान सोहळा शनिवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक एन. डी. खान व सचिव सलमा खान यांनी केले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमास भारतीय एअर फोर्सचे सेवानिवृत्त विंग कमांडर राजेंद्र महानुभव, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी पोलीस आयुक्त एकनाथ खोलम, प्राचार्य श्यामकुमार जाधव, चित्रपट अभिनेते अरुणकुमार, चित्रपट अभिनेत्री सिद्धी पाटणे, शुभांगी पाटील, उपप्राचार्य  सोपान पाटील, पर्यवेक्षक  सतीश बिराडे, अनंत गोळे व दलितमित्र सुदेश दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply