Thursday , March 23 2023
Breaking News

स्वच्छता अभियान अंतर्गत खोपोली नगरपालिकेचे कचर्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रदर्शन

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – घरात निर्माण होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍यापासून सेंद्रीय खतनिर्मिती करून त्याचा उपयोग बागबगीचा सजविण्यासाठी कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली.

या प्रदर्शनात घरगुती ओला व सुक्या कचर्‍याचे नियोजन घरच्या घरी कसे करावे, योग्य वर्गीकरण करून त्यापासून सेंद्रीय खतनिर्मिती कशी करावी, या खताचा उपयोग बागबगीचा निर्मितीसाठी कसा होऊ शकतो, यातून परिसर हिरावागार व खर्च कशा प्रकारे कमी होतो, याचे मार्गदर्शन नगर परिषदेचे अधिकारी विविध प्रात्यक्षिकांद्वारे

देत आहेत.

या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व सामान्य नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्ष सुमन औसरमल, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे यांच्यासह नगरसेवक व अधिकार्‍यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांचा उत्साह वाढविला.

निर्मितीच्या ठिकाणीच कचर्‍याची योग्य व उपयोगी विल्हेवाट झाली, तर 50 टक्के कचरा कमी होऊ शकतो. यासाठी अतिशय कमी खर्चात व अधिक फायदा देणार्‍या नवनवीन कल्पना आहेत. त्याचा उपयोग शहरातील विद्यार्थी, नागरिकांनी करावा व जनजागृती व्हावी, यासाठी नगर परिषदेकडून या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याला मिळत असलेला प्रतिसादही उत्तम आहे. -गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगर परिषद

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply