पनवेल ः वार्ताहरतालुक्यातील साई गावातील वाड्याचा टेप येथील जंगलात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास दोरीच्या सहाय्याने घेऊन मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, उंची 5 फूट 8 इंच, अंगात लाल रंगाचा टी-शर्ट त्यावर लाल रंगाने आला रे गोविंदा…, असे लिहिलेले आहे. तसेच थ्री फोल्ड बरमोडा घातलेली आहे व उजव्या हातावर पांढर्या डायचे घड्याळ आहे. तसेच पायात काळी सॅण्डल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी 27452444 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील करोटे यांच्याशी संपर्क साधावा. शोधाशोध करुनही त्याची ओळख पटलेली नाही. हा नेमका कुठला आहे, त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे कळले नाही.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper