Breaking News

रायगड जर्नालिस्ट संघटनेकडून खोपोलीत पत्रकार कक्षाची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

नगर परिषदेतील कामकाजाबाबत वृत्तांकन करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रायगड जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेने मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रायगड जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण नलावडे, उपाध्यक्ष जयवंत माडपे, सचिव हनुमंत मोरे, सदस्य सारिका सावंत, अनिल वाघमारे, महबूब जमादार, विकी भालेराव, प्रसाद अटक  इत्यादी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply