पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली. तैवान युनिव्हर्सिटीच्या 10 विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयाच्या 30 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन, लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाट़े, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अॅड. प्रमोद ठाकूर सहकार्यवाह शांतिवन, कुष्ठरोग निवारण समितीच्या संयुक्त सचिव फाल्गुन मेहता, शांतिवनचे विश्वस्त विष्णू प्रभूदेसाई उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तैवान युनिव्हर्सिटी व चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांना तैवान व भारत देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे महत्त्व सांगितले, तसेच दोन्ही देशांतील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक याबाबत भाष्य केले.
एनएसएसचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळे यांनी सर्वांचे स्वागत करून एनएसएसचे सामाजिकदृष्ट्या महत्त्व पटवून दिले, तसेच महाविद्यालयाच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, सहभागाबाबत माहिती दिली.
या वेळी महाविद्याल्यात असणार्या सर्व शास्त्रीय उपकरणांची माहिती पाहुण्यांना देण्यात आली. महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर व वेगवेगळ्या विभागांना भेटी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे तैवानमध्ये असलेले राजकीय पक्ष, त्यांच्या राष्ट्रविषयक धोरणांबद्दल तेथील विद्यार्थ्यांनी माहिती दिली. भारत व तैवान या देशांतील लोकप्रिय खेळ, शिक्षण, साहित्य याविषयीच्या माहितीचीही देवाणघेवाण करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एनएसएसचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे़, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. डॉ. योजना मुनीव़, प्रा. सागर खैरनार, एनसीसी महिला विभागप्रमुख प्रा. निलीमा तिदार, इतिहास विभागप्रमुख डॉ. बी. के. भोसले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता तैवान युनिव्हर्सिटी व सीकेटी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी बॉटनिकल गार्डन परिसरात वृक्षारोपण करून झाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper