Breaking News

कोविड लसीकरणाची रंगीत तालीम; रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी ‘ड्राय रन’

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे शुक्रवारी (दि. 8) रायगड जिल्ह्यातदेखील कोविड 19 लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.  जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रूगणालय, पेणचे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोर्लीपंचतन व पोयनाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशी चार केंद्रे लसीकरणासाठी निश्चीत करण्यात आली होती. या केंद्रांत प्रत्येकी 25 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली. लसीकरणाबरोबरच लाभार्थीची नोंद कोविन अ‍ॅपवर करण्यात येत होती. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग येथील केंद्राला भेट देवून तयारीचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने हे सर्व केंद्रांवर लक्ष ठेवून होते. लसीकरणादरम्यान येवू शकणार्‍या अडचणींचा यावेळी अभ्यास करण्यात आला. क्षेत्रीय स्तरावर कोविन अ‍ॅप किती सोयीचे आणि उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे या बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण करण्यापूर्वी लसीकरणाबाबतची आव्हाने या संदर्भातील अभ्यास करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात आला होता.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात शुक्रवारी कोविड लसीकरणाचा ड्रायरन घेण्यात आला. जिल्हा रूग्णालयात 25 लोकांची नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने व जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली तयारी पूर्ण केली आहे. ज्याची लसीकरणासाठी नोंद होईल त्याला संदेश दिला जाईल. त्यानुसार नागरिक लसीकरण केंद्रावर पोहोचतील. तेथे नोंद होवून त्याला लसीकरण खोलीत पाठवले जाईल. ज्यावेळी लस उपलब्ध होईल तेव्हा शासनाच्या नियमाप्रमाणे लस दिली जाईल . -निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply