Breaking News

सोनारीत 96 टक्के मतदान; आज मतमोजणी

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आज 24 फेब्रुवारी 2919 रोजी घेण्यात आली असून, सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व 9 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीतील एकूण 20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून,महिला 866 व पुरुष 854 असे एकूण 1720 मतदारांनी

मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी 96 टक्के मतदान या निवडणुकीत झाले आहे. सकाळ पासूनच सोनारी प्रार्थमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रातच 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती.अतिशय शांततेच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली असून 25 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता उरण तहसिल कार्यालयात निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असून,अवघ्या 40 मिनिटाच्या अवधीत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे यांनी दिली आहे. तर न्हावाशेवा पोलिसांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलिस ताफा तैनात केल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply