Breaking News

भावे नाट्यगृहाचा होणार कायापालट

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील वाशी येथील एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाचा कायापालट होणार आहे. सिडकोकडून 1996 साली बांधलेल्या नाट्यगृहानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात त्याचे नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 11 कोटी 51 लाख 47 हजार 81 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नुतनीकरणासाठी चार ते साडेचार महिने नाट्यगृह बंद राहणार आहे. नाट्यगृहाच्या या कामात स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार असून, त्यात स्टेजवरील नाट्यगृहातील अ‍ॅकोस्टिक, नवीन खुर्च्या बसवणे, सर्व खोल्या व कार्यालयांचे नुतनीकरण, नाट्यगृहाच्या लॉबी क्षेत्राचे नुतनीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविणे, पार्किंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, नाट्यगृहाच्या संरक्षक भिंती दुरुस्ती करणे, नाट्यगृहात दिव्यांग व्यक्तींसाठी बेरिअर फ्री बनविणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत; तर विद्युतविषयक कामांमध्ये साऊंड व लाईटची कामे करण्यात येणार आहेत. यात अत्याधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टीम, सोलार सिस्टीम, इंटरनॅशनल दर्जाची ऑडिओ सिस्टम, प्रोजेक्टर, लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. मध्यंतरी नाट्यगृहातील अनेक असुविधा समोर आल्या होत्या. त्यामुळे पालिकेने नाट्यगृहाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या झळाळीमुळे मुंबईतील अद्ययावत नाट्यगृहांच्या स्पर्धेत विष्णुदास भावे नाट्यगृहाचे नाव झळकणार असून, नवी मुंबईला मानाचे स्थान मिळणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply