Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर

राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5 वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दै शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करणार्‍या व अधिकाधिक
रक्त संकलित करणार्‍या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे, अशी माहिती ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply