Breaking News

पनवेल आयटीआयमध्ये कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील आयटीआयमध्ये बीपीसीएल  कंपनीच्या माध्यमातून कार्यशाळा क्रमांक 3 इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 20) करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, राजू सोनी, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, वृषाली वाघमारे, चीफ जनरल मॅनेजर आर. पी. सिंग, जनरल मॅनेजर एम. एन. नागोराजा, नरेंद्र पाटील, रवींद्र येलपाली आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply