Breaking News

ज्येष्ठांची सामाजिक बांधिलकी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक बांधिलकीचे भान राखूऩ पनवेल तालुक्यातील स्वयंसेवी सामाजिक संस्थांना संघातर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम नुकताच संघाच्या सभागृहात पार पडला. प्रथम पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयवंत गुर्जर यांनी केले. प्रास्ताविकात संघाच्या मदतकार्याची माहिती देण्यात आली. अध्यक्षांच्या हस्ते उपायुक्तांचे स्वागत करण्यात आले. कै. रामचंद्र कुरूळकऱ कर्णबधिऱ मतिमंद निवासी शाळा़ 30़000, करुणेश्वर वृध्दाश्रम़ वाजे 30़000, ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट 30़000 रु. चा फ्रीज, आबानंद महाराज वृध्दाश्रम़ तळोजा 25़000, कर्णबधिर मुलांची निवासी शाळा़ नवीन पनवेल 25़000, प्रभाकरपंत पटवर्धन स्मृती रुग्णालय पनवेल 40़000, वनवासी कल्याण आश्रम़ चिंचवली 30़000 आदी संस्थांना त्यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश देण्यांत आले.

ऑगस्ट 2018मध्ये 22 अपंगांना प्रत्येकी 7़000 व अल्प उत्पन्न गटातील 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10़000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. संघ गेली तीन वर्षे माणुसकी व सामाजिक बांधिलकीतून मदत करीत आहे. बी. एन. खेडेकर यांनी उपायुक्तांचा परिचय करून दिला. या वेळी मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी संघ राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. सभागृह उभारणीसाठी केलेल्या परिश्रमाची माहिती मिळाली. अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी मी जात असते, मात्र असे उपक्रम आढळत नाहीत. माझ्याकडून संघाला नेहमीच सहकार्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. अर्थसहाय्य मिळालेल्या संस्था प्रतिनिधींनी आपल्या संस्थेसंबंधी माहिती देऊन मदतीबद्दल धन्यवाद दिले. अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी संस्थांचे प्रतिनिधी व उपस्थित सभासदांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply